महाराष्ट्रातील पर्यटनाचा विस्तार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यभरात पसरलेली आमची दर्जेदार निवसस्थाने आणि रेस्टॉरंट्स पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. ऐतिहासिक सहलींपासून ते साहसी खेळांपर्यंत आणि खास टूर पॅकेजेसपासून ते जलक्रीडांपर्यंत... महाराष्ट्राचे अथांग वैभव मनसोक्त अनुभवण्यासाठी आम्ही तुम्हाला देतोय उत्तम सोयी आणि संधी!
महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत, एमटीडीसी पर्यटक निवसस्थाने निसर्गरम्य दृश्ये आणि सुखद मुक्कामासाठी ओळखली जातात. तसेच, आमच्या उपाहारगृहात तुम्हाला स्थानिक चवीचे खास पदार्थ चाखायला मिळतील. शांत समुद्रकिनारे, अथांग डोंगररांगा, पावन तीर्थक्षेत्रे आणि रोमांचक जंगले... महाराष्ट्राच्या या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी तुमचे स्वागत आहे!







